Header AD

खडवली मध्ये मनसेतर्फे मोफत आरोग्य शिबीर

 



कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण तालुक्यातील खडवली पंचक्रोशीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. ह्या शिबीराच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध प्रकारच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. ह्या शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शोकडो नागरिकांनी ह्या शिबीराचा लाभ घेत सिकल सेलसी.बी.सी.,शुगरथायरॉईड ह्यांसारख्या विविध प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या.


ह्या कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ समाजसेवक आणि मनसे विभाग प्रमुख रुपेश खंडागळे यांनी केले होते. कार्यक्रमास खडवली प्राथमीक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खामकर तसेच आरोग्य सहाय्यक लिलाधर धिंधळेलॅब टेक्नीशिअन लक्ष्मी गावीतएल.बी.एम. मिलिंद वैरागीलॅब असिस्टंट निरज शिंदे आणि आशा सविता कशिवले यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या कार्यक्रमाला मनसेचे दिनेश बेलकरेलक्षमन भगतराजाभाऊ लोणेरुपेश कांबेरेमहेश कांबेरेलक्ष्मण भोईर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खडवली मध्ये मनसेतर्फे मोफत आरोग्य शिबीर खडवली मध्ये मनसेतर्फे मोफत आरोग्य शिबीर Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

अखेर कल्याण मध्येही बर्ड फ्ल्यूची एन्ट्री अटाळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्येही  ' बर्ड फ्ल्यू ' ची एन्ट्री झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्या...

Post AD

home ads