Header AD

भाजप नगरसेवकाने मैदानासाठी राखीव भूखंडाकडे लक्ष दिले नसते तर हा भूखंड भूमाफियाने हडपला असता आमदार रविंद्र चव्हाण


  


                                                                         

डोंबिवली , शंकर जाधव  :  पालिकेने आरक्षित भूखंडाकडे लक्ष दिले नाहीत तर ते भूखंड विकास हडप करतो हे जगजाहीर आहे.मात्र भाजप नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेडणेकर यांनी लक्ष दिल्याने त्यांच्या प्रभागातील मैदानासाठी राखीव भूखंड भूमाफिया हडप करू शकले नाही.नगरसेवक पेडणेकर यांनी वेळीच लक्ष दिल्याने आज मैदानासाठी आरक्षित भूखंडावर लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम असे मैदान बनविल्यात आले.या मैदानाला माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी उद्यान असे ठेवण्यात आले.या उद्यानाच्या नुतनीकरण व बंदिस्त क्रीडासंकुल लोकापर्ण सोहळ्याप्रसंगी आमदार रविंद्र चव्हाण यांनी भाजप नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेडणेकर यांच्या कामाचे कौतुक केले. भाजप नगरसेवकाने मैदानासाठी राखीव भूखंडाकडे लक्ष दिले नसते तर हा भूखंड भूमाफियाने घश्यात गेला असता असे यावेळी आमदार चव्हाण यांनी जाहीरपणे सांगितले.


भाजपा प्रभाग क्र.६७ म्हात्रे नगर, राजाजी पथ येथे भाजप नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेडणेकर यांच्या संकल्पनेतून माजी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी उद्यानाच्या नुतनीकरण व बंदिस्त क्रीडासंकुल लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या स्वप्नपूर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रविंद्र चव्हाण,माजी मंत्री जगन्नाथ पाटील,कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रदीप चौधरी, माजी अध्यक्ष संजीव बिरवाडकर,नगरसेवक निलेश म्हात्रे,राजन आभाळे,संदीप पुराणिक,साई शेलार,माजी नगरसेवक नरेंद्र पेडणेकर,दिनेश तावडे,प्रज्ञेश प्रभूघाटे,भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई,पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर आदि मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्यानाच्या नामफलकाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरसेवक मुकुंद ( विशू ) पेडणेकर यांनी प्रभागाच्या विकासासाठी आमदार रविंद्र चव्हाण यांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार मानले.तर माजी मंत्री पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपा जनतेच्या सेवेसाठी असून सत्ता असली तरी आणि नसली तरी जनतेची सेवा करतच राहणार असे सांगितले. 


जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी कोरोना काळात जनतेच्या सेवेसाठी सर्वात पुढे असणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. पुढे आमदार चव्हाण म्हणाले,आपल्या ह्या व्यासपीठावर जाहीरपणे सांगावे वाटते कि, भाजप हा पक्ष विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही.आज हे मोठे उद्यान उभे राहिले ते केवळ भाजपच्या इच्छाशक्तीने उभे राहिले. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न असो कि प्रभागातील विकासाचा प्रश्न असो भाजप नगरसेवक सदैव नागरिकांसाठी धावत येतात. आमदार चव्हाण यांनी आपल्या भाषणात पालिकेच्या आरक्षित भूखंडाकडे भूमाफियांचा डोळा असल्याचे जाहीर सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना  मुयुरेश साने आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी अमीत कासार यांनी सांभाळली.

भाजप नगरसेवकाने मैदानासाठी राखीव भूखंडाकडे लक्ष दिले नसते तर हा भूखंड भूमाफियाने हडपला असता आमदार रविंद्र चव्हाण भाजप नगरसेवकाने मैदानासाठी राखीव भूखंडाकडे लक्ष दिले नसते तर हा भूखंड भूमाफियाने हडपला असता आमदार रविंद्र चव्हाण Reviewed by News1 Marathi on December 26, 2020 Rating: 5

1 comment

  1. सर मी पालघर शहरात राहत असून मी एक पत्रकार ही आहे. सध्या मराठी दैनिक, युट्यूब चॅनल साठी काम करतोय, मला आपल्या बरोबर ही काम करायची इच्छा आहे. पालघर शहर व पालघर जिल्ह्याची बातमी मी आपणास पाठवत राहीन..
    कृपया मला संधी द्या..🙏🙏

    आपल्या उत्तराची मी वाट पाहीन..

    नदीम शेख, पालघर 9823435792

    ReplyDelete

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads