वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाची कारवाई
कल्याण ,कुणाल म्हात्रे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ब प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते आणि क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी आज संयुक्त मोहिम राबवून ब आणि क प्रभाग क्षेत्रातील रस्त्यावर, रस्त्यालगत उभी असलेली बेवारस, भंगार वाहने उचलण्याची कारवाई केली.
ब व क प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने कल्याण वाहतुक पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या सहकार्याने आधारवाडी ते कोकणरत्न हॉटेल परिसर, वसंत व्हॅली, गोदरेज हिल परिसर तसेच आधारवाडी ते चिकणघर हायवे या परिसरातून (क प्रभागक्षेत्र परिसरातील ६ फोर व्हिलर गाडया, १ थ्री व्हिलर रिक्षा अशी ७ वाहने व ब प्रभागक्षेत्र परिसरातून ८ चार चाकी वाहने, ४ रिक्षा व २२ दुचाकी वाहने अशी एकूण ३४ वाहने ) अशी एकुण ४१ वाहने, २ हायड्रा, १ जेसीबी व ३ डम्परच्या सहाय्याने उचलून वसंत व्हॅली डेपो येथे जमा करण्यात आले. हि वाहने सोडविण्यासाठी वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे. रस्त्यावर, रस्त्यालगत उभी असलेली बेवारस, भंगार वाहने उचलण्याची ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.
Post a Comment