Header AD

चैन स्नेचिंग करणाऱ्या तिघांना टिळक नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  टिळक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चैन स्नेचिंग करणाऱ्या ३ आरोपींना अटक करण्यात टिळक नगर पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशाल सिद्धार्थ वाघशंकर उर्फ शंखु संतोष जाधव आणि गजानन उर्फ भोळा जनार्दन घाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबत अधिक तपास टिळक नगर पोलीस करत असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.


टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन सॅचिंग करून चोरीच्या गुन्हयांचे वाढते प्रमाण पाहुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी टिळकगनर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र सतर्कपणे गस्त करूननाकाबंदी करूनरेकॉर्डवरिल गुन्हेगार चेक करूनजेल व बेल रिलीज आरोपींना तपासण्याची मोहीम राबवली. टिळकनगर पो.स्टे.मधील  गुन्हयाचा तपास तांत्रिक इनपुटच्या आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत चैन स्नॅचिंग करणारे आरोपी यांची माहीती काढुन आरोपी विशाल सिध्दार्थ वाघ (२३), शंकर उर्फ शंखु संतोष जाधव (१९) दोघेही राहणार  ज्योतीनगर झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळआयरेगांवडोंबिवली पुर्व यांना सापळा लावुन शिताफीने पकडुन अटक केली.


गुन्हयाच्या तपासादरम्यान त्यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडे चैन स्नॅचिंग चोरी करणाऱ्या आरोपीसंदर्भात सखोल तपास केला असतात्यांनी त्यांचा साथीदार गजानन उर्फ भोला जनार्दन घाडी (२६) रा. आयरेगांवज्योतीनगर झोपडपट्टीडोंबिवली पुर्व यांचेसह मिळुन एकुण ०४ ठिकाणी चैन चोरीचे गुन्हे केल्याचे सांगुन एका ठिकाणावरून ऑटो रिक्षा चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.


या गुन्ह्यामध्ये एकुण ६५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ चैन गेल्या असून यापैकी ५१ ग्रॅम वजनाच्या २ लाख ५५ हजार किमतीच्या ०४ सोन्याच्या चैन मिळाल्या आहेत. सदरची कारवाई परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, टिळकनगर पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अभय धुरी,  पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विनोद कडलग यांनी तसेच सोबत सपोउनि/चौगुलेपो. हवा. राठोडपो.ना. भावसारपो.ना. गोरलेपो.ना. थोरातपो.शि. फडपो.शि. सोनवणे यांनी केली आहे. या गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक एस.एम.शेळके हे करीत आहेत.

चैन स्नेचिंग करणाऱ्या तिघांना टिळक नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत चैन स्नेचिंग करणाऱ्या तिघांना टिळक नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads