Header AD

पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमल बजावणी लवकरात लवकर करावी


राष्ट्रवादी गटनेते नजीब मुल्ला यांचे आयुक्तांना पत्रव्यवहार..


ठाणे,  प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यासाठी महासभेने ९ ऑगस्ट,२०१९ ला मंजुरीही दिली. मात्र अद्याप कर्मचारी याना ७ वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. पालिका आयुक्त आणि नजीब मुल्ला यांच्या दालनातील चर्चेनुसार ७ व वेतन आयोग लागू करावा. अशी मागणी केली आहे. 


ठाणे महापालिकेच्या सेवेत काम करणाऱ्या अभियंता संवर्गाला खूप कमी वेतनश्रेणी आहे. तसेच ६ व्या वेतन आयोगामध्ये तर काही संवर्गाच्या ग्रेड पे संदार्भातील त्रुटी आस्थापना विभागाकडून अद्याप दूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ७ व्या आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.या संवर्गाच्या पे ग्रेड मध्ये असलेल्या त्रुटी दूर करून ७ वा वेतन आयोगानुसार वेतन निश्चित करणे गरजेचे आहे. 


६ व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर केल्याने कर्मचारी अधिकारी यांच्यावरील अन्याय दूर होऊन त्यांना न्याय मिळेल याशिवाय, बृहनमुंबई महापालिकेसह अन्य काही महापालिकांनी ७ व्या वेतन आयोगाची अमलबजावणी केली आहे.तेव्हा ठाणे महापालिकेच्या कर्मचारी याना ७ व्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करून जानेवारी २०२१ पासून वेतन देण्याची कार्यवाही करावी. अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली आहे.

पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमल बजावणी लवकरात लवकर करावी पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमल बजावणी लवकरात लवकर करावी Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले

मुंबई, १८ जानेवारी २०२१ :  मागील आठवड्यात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे महत्त्व कमी झाले. तसेच वाढत्या ...

Post AD

home ads