Header AD

जिजाऊ संघटनेच्या वतीने शिक्षणा साठी ५० हजाराची मदत

 भिवंडी ,  प्रतिनिधी   :  भिवंडी तालुक्यातील लाखीवली  गावचे समाजसेवक  राजेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेशजी सांबरे व जिजाऊ संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिका पानवे यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील  खाडीपार येथील कुमारी हलीमा मेहंदी हसन मंसुरी हिला फार्मसी डिप्लोमा शिक्षणासाठी ५० हजाराची मदत कऱण्यात आली .


कुमारी हलीमा मेहंदी हसन मंसुरी ही वाडा तालुक्यातील कुडूस मधील एम एस फार्मसी  कॉलेज फार्मसी डिप्लोमा दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे .हलीमा हिच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे कॉलेज ची  फी भरणे जमत नसल्याने तिच्या पालकांनी राजेंद्र पाटील यांना भेटून आपली परिस्थिती कथन केल्याने  राजेंद्र पाटील यांनी पुढाकार घेऊन जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे व मोनिका पानवे यांची भेट घेऊन तिला पुढील शिक्षणासाठी मदत करावी असे सांगताच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सदर मुलीला मदतीचा हात देऊन ५० हजाराचा चेक हलीमा हिला प्रदान करण्यात आला. यावेळी  तिचे वडीलही उपस्थित होते . यावेळी  जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते पंकज पवार , कैलास भोईर , मच्छिद्र घरत ,जीवन मासळकर आदी मान्यवर उपस्थित होते .
जिजाऊ संघटनेच्या वतीने शिक्षणा साठी ५० हजाराची मदत जिजाऊ संघटनेच्या वतीने शिक्षणा साठी ५० हजाराची मदत Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads