Header AD

मोदी सरकारने तात्काळ वाढवलेली स्वयंपाक गॅसची किंमत रद्द करावी महेश तपासे
डोंबिवली , शंकर जाधव : सर्व सामान्यांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अश्या काळात महागाईने उच्चांक गाठला असून सामन्याचे जीवन जगताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते आहे.अश्या आर्थिक बिकट परिस्थितीत गॅस सिलेंडरची किमत या महिन्यात दोनदा वाढली.केंद्र सरकारच्या या निर्णयावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.यावर राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर टीकेची झोड घेतली आहे.यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सदर दरवाढ ही मोदी सरकारने रद्द करावी अशी मागणी केली.महेश तपासे म्हणाले,कोरोनाच्या काळात सामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकारने १५ दिवसाच्या आत दोन वेळा स्वयंपाक गॅसची किंमत वाढवून सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे पाप केले आहे.एकीकडे लोकांना नोकऱ्या नाहीतव्यापार व कारखानदारी उद्ध्वस्त झाली आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याच्या ऐवजी मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व स्वयंपाक गॅसची किंमत वाढवून सामान्य जनतेला अडचणीत अन्याचे काम केलं आहे.

मोदी सरकारने तात्काळ वाढवलेली स्वयंपाक गॅसची किंमत रद्द करावी महेश तपासे मोदी सरकारने तात्काळ  वाढवलेली  स्वयंपाक गॅसची किंमत रद्द करावी महेश तपासे Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

जिवलग मित्र परिवाराने भरली गरीब विद्यार्थांची वार्षिक फी

  डोंबिवली ( शंकर जाधव )   जिवलग मित्र परिवार डोंबिवली एमआयडीसी पूर्व च्या वतीने   ९   गरजू  विद्यार्थांची  वार्षिक फी भरुन सामजिक   बांधिलक...

Post AD

home ads