आरएसपीच्या सहकार्याने सेंट थॉमस चर्चतर्फे गरजूंना ब्लँकेट वाटप
कल्याण , कुणाल म्हात्रे : सेंट थॉमस ऑर्थोडॉक्स चर्च कल्याण पूर्व यांच्या सहकार्याने आरएसपी कमांडर मणिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागाचे मुख्य फादर एच जी गी वर्गीस मार कुरीलोस यांच्या प्रमुख उपस्थितीत मेरी ख्रिसमस नाताळ सणाचे औचित्य साधून फादर बेंजामिन फादर रिजो चक्को फादर जिजो अचेन, यांच्या प्रमुख उपस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी गरीब आणि गरजू अशा ५० ते ६० लोकांना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले.
यावेळी फादर जी वर्गीस यांनी सर्वांच्या हितासाठी आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रभकडे प्रार्थना केली आणि कोरोना महामारी पासून सर्वांचे संरक्षण करावे अशी आराधना केली. याप्रसंगी आरएसपी अधिकारी अनंत किनगे यांच्यासह फादर एम बी जॉर्ज, बीबीन चक्को (ओसीम सेक्रेटरी), तसेच सेंट थॉमस ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment