Header AD

कल्याण डोंबिवलीत १०७ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५७,१७३ एकूण रुग्ण तर १०९७ जणांचा आता पर्यंत मृत्यू  तर २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या १०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,१७३ झाली आहे. यामध्ये ११०० रुग्ण उपचार घेत असून ५४,९७६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प – २८डोंबिवली पूर्व ३८डोंबिवली प – १६, मांडा टिटवाळा -८, तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६ रुग्ण हे टाटा आमंत्रा मधून,  ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १०७ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  १०७ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

◆ लाखो लोकांना लघु उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश.. मुंबई, २२ जानेवारी २०२१ :  भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेल...

Post AD

home ads