Header AD

भिवंडीत रेल्वे स्टेशन ते जुनी ताडाळी येथे नव्या रस्त्याची मागणी

 




भिवंडी , प्रतिनिधी  :   भिवंडी शहरातील ताडाळी या भागातून वसई दिवा ही रेल्वे जात असून या रेल्वे मार्गावर भिवंडी रोड रेल्वे स्टेशन बनविण्यात आले त्या साठी ताडाळी गावातील शेकडो एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली .त्यावेळी भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते जुनी ताडाळी दरम्यान रेल्वे प्रशासना कडून रस्ता बनविण्यात आले होता.


सध्या या रेल्वे मार्ग लागत नव्याने जे एन पी टी ते दिल्ली पर्यंत  फ्राईट कॅरीडोर चे काम सुरू असून त्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेला रस्ता बाधित होत असल्याने जुनी ताडाळी भागात जाण्यासाठी रस्ता राहणार नसल्याने रेल्वे प्रशासनाने या रेल्वे मार्गा लगत नवा रस्ता बनवून द्यावा अशी मागणी ताडाळी येथील नगरसेवक निलेश चौधरी यांनी रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे .


शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना रेल्वे स्टेशन कडून शहरा बाहेर जाण्यासाठी जुनी ताडाळी येथील हा रस्ता महत्वाचा असून तो रस्ता नष्ट होण्याने नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने हा रस्ता बनविणे गरजेचे असल्याचे आपल्या निवेदनात निलेश चौधरी यांनी स्पष्ट केले आहे
भिवंडीत रेल्वे स्टेशन ते जुनी ताडाळी येथे नव्या रस्त्याची मागणी  भिवंडीत रेल्वे स्टेशन ते जुनी ताडाळी येथे नव्या रस्त्याची मागणी Reviewed by News1 Marathi on December 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads