राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केलेल्या नगरसेवकांचे महानगपालिकेत जल्लोषात स्वागत ...
भिवंडी , प्रतिनिधी : नुकताच मुंबई येथे काँग्रेस च्या १६ बंडखोर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नंतर महानगर पालिका मुख्यालयात नगरसेवकांनी आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जावेद फारुखी , महिला अध्यक्ष स्वाती कांबळे ,अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हलीम खान यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले .
आम्ही निलंबनाच्या भीतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नसून शहराचा विकास डोळ्या समोर ठेवून प्रवेश केला आहे असे माजी उपमहापौर नगरसेवक अहमद सिद्दिकी यांनी स्पष्ट करीत आम्ही बडतर्फ होण्याला घाबरत नसून तत्कालीन काँग्रेस महापौर जावेद दळवी यांच्या अकार्यक्षमतेमुळे आम्ही काँगस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असल्याचे अहमद सिद्दीकी यांनी निक्षून सांगितले .
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केलेल्या नगरसेवकांचे महानगपालिकेत जल्लोषात स्वागत ...
Reviewed by News1 Marathi
on
December 24, 2020
Rating:

Post a Comment