Header AD

ऑपरेशन मुस्कान मुळे ७ वर्षाची काजल पुन्हा कुटुंबात परतली

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण रेल्वे पोलिसांकडून चुकलेल्या मुलांना, चिमुकल्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. याच ऑपरेशन मुस्कानच्या कर्तव्य दक्षतेमुळे काल लोकलने चुकून कल्याण रेल्वे स्थानकात आलेली सात वर्षीय काजल पुन्हा आपल्या कुटुंबात परतली. ऑपरेशन मुस्कानने गेल्या महिनाभरात वाट चुकलेल्या हरवलेल्या ६ चिमुकल्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणली आहे.


अंबरनाथ येथे राहणारे राकेश तिवारी यांची ७ वर्षाची मुलगी काजल काल रात्री घरा शेजारील गार्डन मध्ये खेळत असताना अचानक रेल्वे स्थानकावर पोचली. आपल्या आजी आजोबांसोबत ती ट्रेन ने दिवा येथे ये जा करत  असल्याने ती  ती ट्रेन मध्ये बसली. तिला दिवा येथे आपल्या आजी आजोबांकडे जायचे होते. मात्र गोंधळल्याने ती कल्याण रेल्वे स्थानकावर उतरली. यावेळी रेल्वे स्थानकावर गस्त घालणाऱ्या ऑपरेशन मुस्कान पथकातील कर्मचाऱ्यांचे या चिमुकलिवर लक्ष गेले. त्यांनी तत्काळ या मुलीला ताब्यात घेत तिच्याकडे चौकशी केली.


 याच दरम्यान मुंब्रा पोलीस स्थानकात सदर मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याचे कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली. या तक्रारीची शहानिशा केली असता सदर मुलगी काजलच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. काजलच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. आज सकाळी काजलचे कुटुंबीय कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आले व पोलिसानी काजलला कुटुंबाच्या ताब्यात दिले. अवघ्या आठ तासात काजल परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.


ऑपरेशन मुस्कान मुळे ७ वर्षाची काजल पुन्हा कुटुंबात परतली ऑपरेशन मुस्कान मुळे ७ वर्षाची काजल पुन्हा कुटुंबात परतली Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads