Header AD

कल्याण डोंबिवलीत १०५ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५,६३० एकूण रुग्ण तर १०९१ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १४३ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या १०५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,६३० झाली आहे. यामध्ये १०५७ रुग्ण उपचार घेत असून ५४,४८२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११कल्याण प – ३४डोंबिवली पूर्व ३६डोंबिवली प – १८मांडा टिटवाळा -३, तर मोहना येथील ३ रूग्णाचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ९ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १०५ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १०५ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads