Header AD

भिवंडीत यंत्रमाग कारखान्यास भीषण आग

 




भिवंडी , प्रतिनिधी   :   भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरु असतांना शहरातील भिवंडी ठाणे मुख्य रस्त्यावरील शंकर डाईंग शेजारील चौधरी कंपाऊंड परिसरामध्ये एका यंत्रमाग कारखान्यास शनिवारी दुपारी भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या यंत्रमाग कारखान्यात यंत्रमाग सामुग्री सह मोठया प्रमाणावर तयार कापड व धागा साठविण्यात आला होता . 


आगीचे करण अजून अस्पष्ट असले तरी या आगीत लाखो रुपयांची यंत्रसामुग्री व कच्चा माल जाळून खाक झाला आहे . आगीची घटना समजताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत दोन तासांच्या अथक प्रयत्न नंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. 
भिवंडीत यंत्रमाग कारखान्यास भीषण आग भिवंडीत यंत्रमाग कारखान्यास भीषण आग Reviewed by News1 Marathi on December 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वारसा हक्काच्या नोकरी साठी सफाई कामगारची ५ लाखांची फसवणूक

◆तक्रार मागे घेण्यासाठी केली मारहाण   केडीएमसी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्य...

Post AD

home ads