Header AD

शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादीतर्फे कल्याणात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस कल्याण जिल्हा राष्ट्रवादी तर्फे कल्याण स्पोर्ट्स क्लब कल्याण पश्चिम येथे रक्त दान करून मोठ्या उत्साहात पार पडला.मुख्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यशवंतराव चव्हाण सेंटर मधून एलईडी स्क्रीन च्या माध्यमातून कल्याण स्पोर्ट्स क्लब येथे दाखवण्यात आले. ज्या मध्ये शरद पवार यांच्या गेल्या ८ दशकातील आठवणींना उजाळा देण्यात आला. सध्या राज्यातला रक्ताचा तुटवडा पाहता वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ७० च्या वर रक्तदात्यांनी रक्त दान केले.
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील तसेच महाविकास आघाडी धर्म पाळून कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर आवर्जून उपस्थित होते. 
या शिवाय रमेश हनुमंते, नगरसेवक संतोष तरे,  प्रकाश तरे,  ऍड. भिलारे, जे सी कटारिया, सुभाष गायकवाड, शाम आवारे, प्रशांत माळी, प्रवीण मुसळे, रेखा सोनावणे, किरण शिखरे, समीर वानखेडे, योगेश माळी आदींसह राष्ट्रवादी, राष्ट्रवादी महिला, युवक व विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादीतर्फे कल्याणात भव्य रक्तदान शिबिर संपन्न शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादीतर्फे कल्याणात भव्य रक्तदान शिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on December 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads