Header AD

कल्याण डोंबिवलीत ११८ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 ■५,८६७ एकूण रुग्ण तर १०९४ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ९८ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ११८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या ११८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,८६७ झाली आहे. यामध्ये १०७७ रुग्ण उपचार घेत असून ५४,६९६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प – ३४डोंबिवली पूर्व ३३डोंबिवली प – २७तर मांडा टिटवाळा येथील ८ रूग्णाचा समावेश आहे. 

 


        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ११८ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ११८ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads