Header AD

केडीएमसी ठेकेदाराच्या कामगाराला ग्रामस्थांची मारहाण वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील बारावे परिसरात महापालिकेचे सफाई काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ पुन्हा एकदा पालिकेचे अमृत योजने अंतर्गत ड्रेनेजचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कामगाराला लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पालिकेचे कार्यकारि अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सतत घडणाऱ्या मारहाणीच्या घटनेमुळे कर्मचाऱ्याचे मानसिक खच्चीकरण होत असून विकास कामावर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करत याबाबत तक्रार नोंदवली  आहे.


कल्याण पश्चिम वाडेघर परिसरात महापालिकेचे अमृत योजनेअंतर्गत अंडर ग्राउंड ड्रेनेज चे काम सुरू आहे. आज काम सुरू असताना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी चार ते पाच जण आले. आमच्या मालकीच्या जागेतून काम का करता असा जाब विचारत काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. मनोज नागर असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला उपचारासाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी पण हे काम सुरू असताना सात ते आठ कर्मचारयाना ग्रामस्थांकडून मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दिली.

केडीएमसी ठेकेदाराच्या कामगाराला ग्रामस्थांची मारहाण वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण केडीएमसी ठेकेदाराच्या कामगाराला ग्रामस्थांची मारहाण वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads