Header AD

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; कपड्यांच्या गोदामाला भिषण आग


 


भिवंडी , प्रतिनिधी   :  तालुक्यातील वळ   ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील  कोमच्या (तागा) व कपडयांच्या  गोदमला भीषण आग लागल्याची घटना उघडली आहे. आगीची माहिती मिळताच  घटनास्थळी अग्निशमन  दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन  जवानाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र आगीच्या सत्राने भिवंडीतील गोदामपट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भिवंडी अग्निशनच्या २ गाड्या रस्त्यातच बंद पडल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कल्याण , ठाणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र या भीषण आगीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या डोळयांना व घश्याना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. तर याघटनेत कोणाही दुखापत झाली नसल्याचे वृत्त आहे. 

 

यापूर्वीही  कपड्याच्या गोदामासह यंत्रमाग  कारखान्याला लागल्या होत्या आगी 

 

भिवंडी शहरात गेल्याच आठ दिवसापूर्वी फातिमा नगर  परिसरात असलेल्या एका  यंत्रमाग कारखान्याच्या मोठ्या गोदामाला आग लागली होती.  या गोदामात  कपड्यांसह  धाग्याचे  कोम  मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत लाखो रुपयांचा कपडा व  धाग्याचे  कोम जळून खाक झाले. तर १५  दिवसापूर्वी भिवंडी शहरात अंजूर फाटा येथील चौधरी कंपाऊंड परिसरामध्ये  एका यंत्रमाग कारखान्यामध्ये भीषण  आग लागली होती.  याठिकाणी मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा जळून खाक झाला होता. तर आठ दिवसापूर्वीही  भिवंडीतील राहनाळ गावात बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाऊंड येथे एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत गोदामातील लाखो रुपयांचे धाग्यांचे कोम जळून खाक झाले. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. त्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले होते. 


भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; कपड्यांच्या गोदामाला भिषण आग भिवंडीत पुन्हा अग्नितांडव ; कपड्यांच्या  गोदामाला भिषण आग Reviewed by News1 Marathi on December 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads