Header AD

शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत हॉटेलच्या बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई


■माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सच्या बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली...


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सवर धडक कारवाई करून शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.


माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत हुक्का पार्लर सुरु असल्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी पत्राद्वारे कळविण्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते.  त्याअनुषंगाने आज मौजे नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील पिंक बाबा या हॉटेलचे शेडचे बांधकाम, पाच लाकड़ी मचान व बांबू ताडपत्री शेडच बांधकाम निष्कासित करण्यात आले. ओवळा ब्लुरुफ येथील वेलवेट गार्डन या हॉटेलच्या शेडचे बांधकाम तसेच नाका हॉटेलच्या शेडचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले.


सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रणव व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच महापालिकच्या अधिकृत ठेकेदाराचे २० मजुर, १ जेसीबी मशीन, २ डंपर इत्यादीच्या साहाय्याने करण्यात आली.



शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत हॉटेलच्या बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत हॉटेलच्या बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on December 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads