Header AD

मानपाडा पोलिसांनी उघडकीस आणले घरफोडी,चोरी आणि चैन स्नॅचिंगचे आठ गुन्हे १२ आरोपींना अटक
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  गेल्या काही दिवसात कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडीचोरी  आणि चैन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने मानपाडा पोलिसांनी अहोरात्र नाकाबंदीकोंबिंग ऑपरेशन तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारां बाबत विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेला मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे मानपाडा पोलिस ठाण्यातील घरफोडी,चोरी आणि चैन स्नॅचिंग चे आठ गुन्हे उघडकीस आणून बारा आरोपींना अटक केली आहे.


कल्याण शीळ रोडवरील के झोन नावाच्या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ३,३६,३७७ रुपये किमतीचे मोबाईल फोन व ३ एल.सी.डी. टीव्ही असा मुद्देमाल चोरी झाला होता. यातील चोरांबाबत कोणतीही माहिती नसताना देखील प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे तांत्रिकरित्या तपास करून शहजाद अहमद मोहम्मद शाफिक अन्सारीसमीर कदिर शेखसद्दाम हुसैन अब्दुल सत्तार शेख यांना अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा१ हायर कंपनीचा एल.ई.डी. टीव्ही२  मोबाईल फोन असा एकूण १,१८,९०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच घरफोडी करणारे आरोपी शेहजाद शहाबुद्दीन मन्सुरी/शेखमुमताज मेहराज शेखइम्रान मकबूल खानइरफान कुददुस शेख यांचे कडून १० मोबाईल फोन१ लॅपटॉप१ सोनी कंपनीची म्युझिक सिस्टीम आणि ५ वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या असा एकूण ५१,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.


तसेच गुप्त बतमीदाराच्या मदतीने चैन स्नॅचिंग करणारे आरोपी विनय जवाहरलाल प्रजापती, सुनील कल्पनाथ जैस्वार यांनी चोरी केलेले २५,००० रुपये किमतीचे १२ ग्राम वजनाचे  सोन्याचे मंगळ सूत्र आणि आरोपी भावेश संदीप भोईर याचेकडून २२,००० रुपये किमतीची सोनसाखळी आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा ऐवज हस्तगत केला. तसेच  दिनांक  ७ नोव्हेंबर २०२० रोजी कैलास भंडारी यांच्यावर धारदार चाकूने त्यांचे पोटावर आणि छातीवर गंभीर दुखापत करून पळून गेलेले आरोपी कृष्णा दिलीप कुशलकर, शुभम सावला पेटेकर यांना खडकवासला पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अशा प्रकारे ४ घरफोडी, १ चोरी व २ चैन स्नॅचिंग, १ शरीराविरुद्धचा भा.द.वि. कलम ३०७ चा असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणून १२ आरोपीनां अटक करून त्यांचेकडून २,८७,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार, सपोनि सुरेश डांबरे, पोउपनि अनंत लांब, अंमलदार पाटील, काटकर, दिलीप किरपण, विजय कोळी आणि इतर कर्मचाऱ्यांनी पार पडली.

मानपाडा पोलिसांनी उघडकीस आणले घरफोडी,चोरी आणि चैन स्नॅचिंगचे आठ गुन्हे १२ आरोपींना अटक मानपाडा पोलिसांनी उघडकीस आणले घरफोडी,चोरी आणि चैन स्नॅचिंगचे आठ गुन्हे १२ आरोपींना अटक Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads