Header AD

ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचे निधन
ठाणे , प्रतिनिधी  :  ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे मंगळवारी निधन झाले ते 84 वर्षांचे होते. 


लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर 1952 साली मामलेदार मिसळ हे हॉटेल सुरु केले होते. त्यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडीत सुरु ठेवली. गेली अनेक वर्षे ते मिसळच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा करीत होते. 


मागील आठवड्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे.

ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचे निधन ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मण शेठ मुर्डेश्वर यांचे निधन Reviewed by News1 Marathi on December 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२५ नवे रुग्ण तर १८ मृत्यू ५२८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   २२५  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ ता...

Post AD

home ads