Header AD

शिवाजी नगर, वागळे इस्टेट परिसरा तील किसननगर व रायलादेवी पेटीवरील 80 सफाई कर्मचारी कोविड सन्मान पुरस्काराने सन्मानित




ठाणे , प्रतिनिधी  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञनतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे. आज याच उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर, वागळे इस्टेट परिसरातील किसननगर व रायलादेवी पेटीवरील सुमारे 80 सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 




ठाणे शहरात कोरोनावर अटकाव घालण्यात सफाई कामगारांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, तळागाळातील या वर्गाचा सन्मान कोणीही केला नसल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठामपाच्या सेवेतील सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. 12 डिसेंबर रोजी मुख्य सोहळ्यामध्ये 5 सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला आहे. तर, उर्वरित सफाई कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन गौरविण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या हस्ते शिवाजी नगर, वागळे इस्टेट परिसरातील किसननगर व रायलादेवी पेटीवरील सुमारे 80 सफाई कामगारांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.




यावेळी सरचिटणीस रवींद्र पालव, उपाध्यक्ष सिल्वेस्टर डिसोझा, सचिव प्रविण भानुशाली, श्री. शिवा कालुसिंह, कोपरी पांचपाखाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष विक्रांत घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, ठाणे शहर महिला विधानसभा अध्यक्ष मेहरबानो पटेल, कोपरी विधानसभा युवक अध्यक्ष संतोष मोरे, वागळे इस्टेट ब्लॉक अध्यक्ष विशाल खामकर, ब्लॉक कार्याध्यक्ष मुर्तूझा अली अन्सारी व तुकाराम गायकवाड, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, विजय हाडगे, राम भाई, महिला ब्लॉक अध्यक्षा ज्योतीताई निंबर्गी, युवक ब्लॉक अध्यक्ष रोहीत भंडारी, वॉर्ड अध्यक्ष विजय शिगवण, संतोष बामणे, कोपरी पांचपाखाडी युवक कार्याध्यक्ष विरेश शेट्टी, वहाब भाई, हितेंद्र पांचाळ, समीर पांचाळ, सिद्धेश लोडे, छोटे भाई, संकेत नारणे तसेच महिला पदाधिकारी सुवर्णा खिल्लारी, स्मिता पारकर, वंदना इंडोटे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, अमृता मिसाळ, माधुरी मिसाळ, सुरेखा शिंदे आदी कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.

शिवाजी नगर, वागळे इस्टेट परिसरा तील किसननगर व रायलादेवी पेटीवरील 80 सफाई कर्मचारी कोविड सन्मान पुरस्काराने सन्मानित शिवाजी नगर, वागळे इस्टेट परिसरा तील किसननगर व रायलादेवी पेटीवरील 80 सफाई कर्मचारी कोविड सन्मान पुरस्काराने सन्मानित Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads