Header AD

स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे! प्रशासकीय खर्चातील 75 टक्के पैसा कंपनीच्या तिजोरीत, नारायण पवार यांचा आक्षेप

ठाणे,  प्रतिनिधी  : 
ठाणे शहरात स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाला असताना स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे झाले आहे. यंदाच्या वर्षी पहिल्या 8 महिन्यात स्मार्ट सिटी कंपनीत 1 कोटी 88 लाख 75 हजार 176 रुपये प्रशासकीय खर्चाची नोंद झाली आहे. मात्र त्यापैकी तब्बल 1 कोटी 40 लाख रुपये दोन सल्लागार कंपनीच्या तिजोरीत जमा झाले. या प्रकाराला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.


स्मार्ट सिटी कंपनीतून 42 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पांसाठी क्रिसिल रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन व पॅलाडियम कन्सल्टींग इंडिया कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांना एप्रिलपासून नोव्हेंबर 2020 पर्यंत बिले देण्यात आली आहेत. त्यात क्रिसिलला एक कोटी 16 लाख 54 हजार रुपये 169 रुपये व पॅलाडियम कंपनीला 25 लाख 67 हजार 219 रुपये देण्यात आले. या दोन्ही कंपन्यांच्या तिजोरीत अवघ्या आठ महिन्यांत एक कोटी 42 लाख रुपये जमा झाले, याकडे भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे कोरोनामुले 25 मार्चपासून स्मार्ट सिटीचे काम ठप्प झाले. 


पण काही अंशी व्यवहार सुरू झाल्यानंतर 16 जुलै रोजी क्रिसिल कंपनीला तातडीने एकाच वेळी तीन बिलांचे 41 लाख रुपये वितरित करण्यात आले, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे. वेळेत काम होण्याबरोबरच खर्चात बचत व्हावी, यासाठी सल्लागार नेमले गेले होते. प्रत्यक्षात चार वर्षांपासून स्मार्ट सिटी कंपनीचा गोंधळ समोर आला आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांनी कोणता सल्ला दिला होता, या सल्ल्याचा किती उपयोग झाला, त्याची अंमलबजावणी किती झाली, याची ठाणेकरांना माहिती द्यायला हवी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.
स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे! प्रशासकीय खर्चातील 75 टक्के पैसा कंपनीच्या तिजोरीत, नारायण पवार यांचा आक्षेप स्मार्ट सिटीच्या सल्लागार कंपन्यांचे उखळ पांढरे! प्रशासकीय खर्चातील 75 टक्के पैसा कंपनीच्या तिजोरीत, नारायण पवार यांचा आक्षेप Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यातील लॉज व हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे... ठाणे , प्रतिनिधी  :    ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये ...

Post AD

home ads