Header AD

उथळसर पेटीवरील 70 सफाई कर्मचारी कोविड सन्मान पुरस्काराने सन्मानित
ठाणे , प्रतिनिधी  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञनतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्‍या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे. आज याच उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली उथळसर येथील सुमारे 70 सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


ठाणे शहरात कोरोनावर अटकाव घालण्यात सफाई कामगारांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, तळागाळातील या वर्गाचा सन्मान कोणीही केला नसल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठामपाच्या सेवेतील सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
12 डिसेंबर रोजी मुख्य सोहळ्यामध्ये 5 सफाई कामगारांचा गौरव करण्यात आला आहे. तर, उर्वरित सफाई कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन गौरविण्यात येत आहे. सोमवारी उथळसर येथील पटीवर जाऊन राष्ट्रवादीच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग यांच्या हस्ते सुमारे 70 सफाई कामगारांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 


यावेळी सरचिटणीस रवींद्र पालव, सचिव आसद चाऊस, चिटणीस संतोष सहस्त्रबुद्धे, ठाणे विधानसभा कार्याध्यक्ष महेंद्र पवार, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, ब्लॉक कार्याध्यक्ष संताजी गोळे, कौस्तुभ दुमाळ, विधानसभा युवक अध्यक्ष अभिषेक पुसाळकर, वॉर्ड अध्यक्ष विक्रांत चव्हाण, नितीन कोरपे, साहिल तिडके, महिला प्रदेश सचिव ज्योती निंबर्गी. वॉर्ड अध्यक्षा अरुणा पेंढारे, सुशांत जाधव  आदी कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.

उथळसर पेटीवरील 70 सफाई कर्मचारी कोविड सन्मान पुरस्काराने सन्मानित उथळसर पेटीवरील 70 सफाई कर्मचारी कोविड सन्मान पुरस्काराने सन्मानित Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads