Header AD

4जानेवारी, 2021 रोजी महापालिका लोकशाही दिन 21 डिसेंबर, 2020 पुर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन 

ठाणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनसामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक,क्र.प्रसुधा-1099/सीआर-23/98/18 ,दिनांक 26 सप्टेंबर,2012 नुसार माहे डिसेंबर, 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्विकारता नागरिकांनी त्यांचे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याबाबत अध्यादेश निर्गमित केलेला आहे. तरी नागरिकांनी जानेवारी, 2021 महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 21 डिसेंबर, 2020 पुर्वी निवेदन महापालिका भवननागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावे. सदर निवेदन दाखल करताना प्रपत्र-1 (ब) प्रत्येक निवेदना सोबत अर्जदाराने सादर करणे  आवश्यक आहे. प्रपत्र-1 (ब) नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.


        मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेततसेच त्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाहीअशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन  सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.


        अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावीएकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.  त्याचप्रमाणे आस्थापना विषयकविविध न्यायालयात,  लोकआयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारीमाहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणेतसेच राजकीय पक्षाच्यानगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम  उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्जतक्रार वैयक्तिक  स्वरुपाची नसेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

4जानेवारी, 2021 रोजी महापालिका लोकशाही दिन 21 डिसेंबर, 2020 पुर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन 4जानेवारी, 2021  रोजी महापालिका लोकशाही दिन 21 डिसेंबर, 2020 पुर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads