कान्हेरी बुद्ध लेणी बोरीवली मुंबई या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 31 डिसेंबर रोजी धम्मपरिषद
मुंबई, प्रतिनिधी : कान्हेरी बुद्ध लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई या ठिकाणी वीस वर्षापासून परिषद आयोजित केली जाते व या ठिकाणी असणाऱ्या या जागतिक वारसा च्या बुद्ध लेण्या चा प्रसार प्रचार व संवर्धन करण्याकरता याठिकाणी धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. याच अनुषंगाने या वर्षी 31 डिसेंबर रोजी धम्मपरिषद आयोजित केली आहे. त्यासंदर्भात धम्म परिषदेचे आयोजक भंते शांतीरत्न , भंते लामा ,स्वागताध्यक्ष दिलीप वावळे बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे सुभाष वावळकर समसिंग परमेश्वर राऊत आरपीआयचे प्रशांत मोहिते भाजपाचे मंगेश मोरे महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांच्या शिष्टमंडळाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन साहेब यांची भेट घेतली.
तसेच कस्तुरबा पोलिस ठाणे बोरिवली पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची भेट घेतलीव कान्हेरी बुद्ध लेणी या ठिकाणी जाऊन परीक्षेच्या आयोजनाची तयारी बघितली. यावेळी धम्मपरिषद ला मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांनी पूर्णसहकार्य सर्व ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. तसेच हा कार्यक्रम यावेळी खरा लोकनायक यूट्यूब चैनल वर होणार आहे तसेच महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन पूर्ण महाराष्ट्रातून या कार्यक्रमाचे वृत्त प्रकाशित करणार आहे.

Post a Comment