Header AD

मुंबई - नाशिक महामार्गावरील चालका ताबा सुटल्याने गॅस टँकर 30 फूट खोल खाईत जाऊन पलटी; त्यापाठोपाठ ट्रक, कंटेनर पलटी, गॅस गळतीच्या भीतीने घबराट 

भिवंडी ,  प्रतिनिधी  :   भिवंडी परिसरात  मध्यरात्री पासून अवकाळी पावसाची रिपरिप पहाटेपर्यत सुरु असतानाच त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका भल्यामोठ्या  एचपी  गॅस टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने गॅसने भरलेला  टँकर महामार्गाचे लोखंडी कठडे तोडून चार - पाच पलट्या घेत शेतात जाऊन उलटल्याने  गॅस गळतीच्या भीतीमुळे  महामार्गावर घबराट पसरली आहे. हि घटना   भिवंडी तालुक्यातील पिंपळास फाटा इथं  मुंबई - नाशिक महामार्गावर पहाटेच्या सुमारास  घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 
  
महामार्गाचे लोखंडी कठडे तोडून गॅस टँकर शेतात; तर पाठोपाठ  कंटेनर व ट्रकही  पलटी  महामार्गाचे लोखंडी कठडे तोडून चार - पाच पलट्या घेत शेतात जाऊन   गॅस टँकर  उलटल्याने त्यापाठोपाठ मागेच  असलेला एक भंगार भरलेला ट्रक आणि कंटेनर पलटी झाला होता.  यामुळे   मुंबई - नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेने वाहतूक तासभर ठप्प झाली होती. तर रस्त्यावर पटली झालेले कंटेनर व ट्रक वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक कोंडी 3 तासात सुरळीत केली आहे. मात्र अद्यापही स्थानिक कोनगाव पोलीस व  वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल असून पलटी झालेल्या  गॅस टँकर भरलेला असल्याने गॅस गळती होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर गॅस टँकर घटनास्थळावरून हलविण्यात यावा अशी मागणी परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...
मुंबई - नाशिक महामार्गावरील चालका ताबा सुटल्याने गॅस टँकर 30 फूट खोल खाईत जाऊन पलटी; त्यापाठोपाठ ट्रक, कंटेनर पलटी, गॅस गळतीच्या भीतीने घबराट मुंबई - नाशिक महामार्गावरील चालका ताबा सुटल्याने  गॅस टँकर  30 फूट खोल खाईत  जाऊन पलटी; त्यापाठोपाठ ट्रक, कंटेनर पलटी, गॅस गळतीच्या भीतीने घबराट Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads