Header AD

ठाणे महापालिका मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प नव्या रुपात साकारणार महापौर नरेश म्हस्के मे 2021 पर्यत शिव शिल्पाचे काम पूर्ण होणार


 


ठाणे, प्रतिनिधी : ठाणे महापालिकेच्यण मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प हे नव्या रुपात ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. या शिल्पाचे काम सुरू असून मे 2021 पर्यत पूर्ण होणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. या शिल्पाचे क्ले स्वरुपातील प्रारुप चित्राचे सादरीकरण आज महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर आदी उपस्थित होते.


            महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागावर शिवराज्याभिषेकाचे शिल्प बसविण्यात आले आहे. परंतु सदरचे शिल्प 25 वर्षे जुने असल्याने बहुतांशी जीर्ण झाले होते. यासाठी सर्व स्तरातून सदर शिल्प नव्याने बसविण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी मागील वर्षभर प्रशासनासोबत बैठका घेवून सदर शिल्पाबाबत महापौर यांनी पाठपुरावा केला आहे. 


याकामी मे. गार्नेट इंटेरियर्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे माध्यमातून प्रारुप शिल्प तयार करण्यात आले आहे, या चित्राचे सादरीकरण कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले. सदर शिल्पामध्ये काही किरकोळ दुरूस्ती करण्याबाबत सूचना देखील करण्यात आल्या. या शिल्पाचे अंतिम काम मे 2021 अखेरपर्यत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर यांनी यावेळी दिली.


            अत्यंत आकर्षक स्वरुपात भव्य दिव्य शिल्प साकारण्यात येत असून यामध्ये कोणाशी स्पर्धा करण्याचा हेतू नाही. नव्या पिढीला  छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याची माहिती व्हावी या उदात्त हेतूने हे शिल्प बसविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात असे देखणे शिल्प साकारणारी ठाणे ही पहिलीच महापालिका असेल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.


            यावेळी शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, भाजपाचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका साधना जोशी,अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख,  नगर अभियंता रविंद्र खडताळे, कार्यकारी अभियंता सदाशिव माने आदी उपस्थित होते. 

ठाणे महापालिका मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प नव्या रुपात साकारणार महापौर नरेश म्हस्के मे 2021 पर्यत शिव शिल्पाचे काम पूर्ण होणार ठाणे महापालिका मुख्यालयावरील शिवराज्याभिषेक शिल्प नव्या रुपात साकारणार  महापौर नरेश म्हस्के मे 2021 पर्यत शिव शिल्पाचे काम पूर्ण होणार Reviewed by News1 Marathi on December 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

जिवलग मित्र परिवाराने भरली गरीब विद्यार्थांची वार्षिक फी

  डोंबिवली ( शंकर जाधव )   जिवलग मित्र परिवार डोंबिवली एमआयडीसी पूर्व च्या वतीने   ९   गरजू  विद्यार्थांची  वार्षिक फी भरुन सामजिक   बांधिलक...

Post AD

home ads