Header AD

ठाणे पूर्वेतील 134 सफाई कामगारांचा राष्ट्रवादीकडून सन्मान

 



ठाणे ,  प्रतिनिधी  :  आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे पूर्व येथील सुमारे 134 सफाई कामगारांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे. 




आज याच उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या आदेशाने शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पूर्व भागात स्वच्छतेचे काम करणार्‍या कोपरी गाव पेटीवरील 35, धोबीघाट पेटीवरील 35 आणि कोळीवाडा पेटीवरील 64 अशा 134  सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.




यावेळी  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुजाता घाग,परिवहन सदस्य नितीन पाटील, सरचिटणीस रवींद्र पालव, सचिव अजित सावंत, शिवा कालुसिंग, दिलीप लोखंडे,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर,अध्यक्ष सामाजिक न्याय कैलास हावले, असंघटित कामगार अध्यक्ष राजू    चापले, विधानसभा युवक अध्यक्ष संतोष मोरे,जेष्ठ नागरिक रमाकांत पाटील,कमलाकर केदारे,ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे, निलेश फडतरे महिला उपाध्यक्ष माया केसरकर, महिला ब्लॉक अध्यक्ष भानुमती पाटील, ज्योती निबंरगी,कार्याध्यक्ष राहुल ठाणेकर वॉर्ड अध्यक्ष संतोष सावंत,मनीष ठाणेकर, कुणाल कुडके,महिला वॉर्ड अध्यक्ष रुपाली गावंड, धनश्री पाटील, स्वाती टिळक, मंदा रासकर, स्मिता ठाणेकर, प्रियांका नाखवा, श्रावण भोसले, वॉर्ड अध्यक्ष अमोल गायके, गणेश खेडेकर,तुषार गावंड, महिला पदाधिकारी वंदना लांडगे, शुभांगी कोळकर, वंदना हुंडारे, स्मिता पारकर, सुरेखा शिंदे, सुवर्णा खिल्लारे, तसेच राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाणे पूर्वेतील 134 सफाई कामगारांचा राष्ट्रवादीकडून सन्मान ठाणे पूर्वेतील 134 सफाई कामगारांचा राष्ट्रवादीकडून सन्मान Reviewed by News1 Marathi on December 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads