Header AD

राष्ट्रवादीकडून 108 सफाई कामगारांचा सन्मान

 



ठाणे , प्रतिनिधी  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे. आज याच उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या आदेशाने शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली दादाजी कोंडदेव स्टेडियम येथील पेटीवरील सुमारे 108 सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


यावेळी  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहर अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, लिगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. विनोद उत्तेकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष दिलीप नाईक, हॉकर्स सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, ठाणे शहर विधानसभाध्यक्ष विजय भामरे, ठाणे शहर विधानसभा कार्याध्यक्ष महेंद्र पवार, विशाल खामकर, ब्लॉक अध्यक्ष निलेश कदम, समीर पेंढारे, ठाणे शहर विधानसभा महिलाध्यक्षा कांता गजमल, संजीव दत्ता, ब्लॉक अध्यक्षा स्मिता पारकर, अनिता मोटे, ब्लॉक उपाध्यक्ष प्रमोद नेमाणे, वॉर्ड अध्यक्ष सुमीत गुप्ता, संदीप ढकोलिया, शैलेश कदम, संतोष घोणे, शिवा यादव, विक्रांत चव्हाण, साईप्रसाद प्रभू, विवेक गोडबोले, दिनेश दळवी, रविंद्र साळुंखे, नलिनी सोनावणे, विक्रम सिंग, नजीर बुर्‍हाण, नारायण उत्तेकर, संकेत नारणे,संताजी गोळे, कुणाल भोईर  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीकडून 108 सफाई कामगारांचा सन्मान राष्ट्रवादीकडून 108 सफाई कामगारांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on December 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads