Header AD

अजेय संस्थेचा शतशः हा कार्यक्रम

 अजेय संस्थेमार्फत 2019 साली पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त 26 जानेवारी 2019 रोजी, 100 विनोदी कथांच्या अभिवाचनांचा कार्यक्रम करण्यात आला होता. तत्पूर्वी 23 डिसेंबर 2018 ला शतकोटी रसिक या WhatsApp समूहाची स्थापना झाली. या साहित्यिक प्रेमी गटात विविध उपक्रम, संकल्पना तसेच गायन, लेखन, नृत्य, चित्र, शिल्प, विविध प्रकारच्या रेसिपीज तसेच इतर अनेक कला व साहित्यरूपी भरभराट होऊ लागली. कोरोना या वैश्विक आपत्तीमुळे लॉकडाऊन काळात हा समूह जास्तच ऍक्टिव्ह झाला व या समूहातून अनेक नवकवी, लेखक, संगीत तसेच अनेक क्षेत्रातील सुप्त कलाकार त्यांना मिळालेल्या पर्वणीचा लाभ घेत आपली कला व साहित्य गृप वर सादर करू लागले. 


अजेय संस्थेने सुद्धा या समूहामार्फत लॉकडाऊन काळात साहित्य पाठवण्यासाठी विविध पर्व जसे की गृहपर्व, श्रावणपर्व, निखळपर्व आणि दिवाळीत प्रकाशपर्व यामार्फत विविध लेखन काव्यस्पर्धा आयोजित करून रसिकांना लिहिते होण्याची संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच मी, संवेदना, चमत्कार, माणूस, झपुर्झा वाचनवेडे, अंतराय यांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करून सर्व शतकोटी रसिक गृप मधील समूहाला लॉकडाऊन काळात सुद्धा व्यस्त ठेवले. शतकोटी रसिक समूह त्यांचा दुसरा वर्धापन दिन साजरा करून तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि येत्या नवीन वर्षात अजून नवीन उपक्रम, नवे बदल व नवीन आव्हाने पेलत हा समूह रसिकांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे.


या वर्षातील शतकोटी रसिक / अजेय संस्थेचा शेवटचा आणि सर्वांत मोठा कार्यक्रम हा 25 डिसेंबर 2020 रोजी द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता शतकोटी रसिकच्या फेसबुक पेज वर लाईव्ह बघता येईल. यात शतकोटी रसिक समूहातील अनेक कलाकार विविध माध्यमातून जसे की गायन, नृत्य, काव्य या स्वरूपात आपली कला सादर करणार आहेत. तसेच वर्षभरात जे काही उपक्रम आयोजित केले त्याबद्दल विविध प्रकारचे पुरस्कार सुद्धा दिले जाणार आहेत तर आपण जास्तीत जास्त संख्येने 25 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता शतकोटीच्या फेसबुक पेजवर होणाऱ्या शतकोटीच्या या वर्षातील शेवटचा व मोठा कार्यक्रम शतशः याचा आस्वाद घ्यावा.डॉ. क्षितीज कुलकर्णी

 संचालक अजेय संस्था  

अजेय संस्थेचा शतशः हा कार्यक्रम अजेय संस्थेचा शतशः हा कार्यक्रम Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads