Header AD

भिवंडी शहराला बकाल करणाऱ्या पालिकेच्या नगर विकास विभागाची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी शहर महानगरपालिका अस्तित्वात येऊन २० वर्षे पूर्ण होत असून महापालिका क्षेत्रातील बारा महसूल गावात आतापर्यंत सहाय्यक संचालक नगर रचना अधिकाऱ्यांनी दोन हजार इमारत बांधकाम परवानगी दिल्या आहेत मात्र बहुतांशी परवानगी विकास आराखड्यात बाधित होणारे तर काही बाधकामे दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त केलेले आहे तसेच अनेक इमारतीमध्ये कार पार्कींगची व्यवस्था नसल्याने तेथील कार ह्या रस्त्यावर पार्कींग केल्या जात आहेत.त्यामुळे शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.दिलेल्या परवानगी पैकी फक्त  ५५० इमारतींना नाहरकत तसेच इमारत वापर दाखला दिला आहे.पालिका प्रशासनाच्या या मनमाणीमुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी सभापती अशोक भोसले यांनी केला असून शहराला बकालपणा आणणाऱ्या नगरविकास विभागाच्या अधिकारी व शहानिशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर  कारवाई करावी अशी ही मागणी शिवसेनेने केली आहे.


सन २००१ मध्ये भिवंडी महानगरपालिका  अस्तित्वात आली तर विकास आराखडा २००७ मध्ये मंजूर झाला तेव्हापासून आतापर्यंत १९ आयुक्त महापालिकेत आले मात्र बांधकाम परवानगी देताना सहाय्यक नगर रचना अधिकारी आयुक्तांशी चर्चा करून नंतर इमारत बांधकाम परवानगी देतात मात्र शहानिशा अधिकारी जो अहवाल सादर करतात त्या आधारे इमारत बांधकाम परावगी दिली जाते मात्र दिलेल्या परवानगीतील ज्या २८ अटी व शर्थी आहेत त्याची अंमल बजावणी केली जात नाही तर बहुतांशी बांधकामांना आकृषीक परवानगी नसल्याने विकासक इमारत बांधकाम करून ती विकून निघून जातो मात्र फ्लॅट धारकांना वर्षानुवर्ष अकृषिक दंड भरावा लागत आहे याला पालिकेचा नगर रचना विभाग जबाबदार आहे.


इमारतीमध्ये कार पार्कींग व्यवस्था नसल्याने ते रस्त्यावर पार्कींग करावे लागत आहेत त्यामुळे शहरात वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे तर दिलेल्या परवानगीनुसार बांधकाम न केल्याने वाढीव बांधकामाचे पैसे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा आरोप नगरसेवक अशोक भोसले यांनी केला आहे तर काही इमारत बांधकाम विकास आराखड्यात बाधित होत असताना देखील परवानगी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नगरसेवक भोसले यांनी केला असून याची राज्य शासनाने सबंधीत आयुक्त व नगर रचना विभागातील अधिकारी व शहानिशा अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
भिवंडी शहराला बकाल करणाऱ्या पालिकेच्या नगर विकास विभागाची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी भिवंडी शहराला बकाल करणाऱ्या पालिकेच्या नगर विकास विभागाची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads