Header AD

घोडबंदरच्या सर्विस रोडच्या रखडलेल्या कामाची खासदार राजन विचारे कडून पाहणी
ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे शहरातील वाढते शहरीकरण व घोडबंदर परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने हायवे पूर्वदुती महामार्गाच्या शेजारी सुरू केलेल्या सर्विस रोड मार्गासाठी  ४ ठिकाणी असणाऱ्या जागा संजय गांधी उद्यानाच्या हद्दीत येत असल्याने परवानगी न मिळाल्याने ही कामे वर्षभरापासून रखडलेली होती खासदार राजन विचारे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे  अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य वनसंरक्षक व महापालिका आयुक्त यांच्यासोबत बैठक संपन्न केली होती त्याच अनुषंगाने आज प्रत्यक्ष जागेवर पाहणी  खासदार राजन विचारे केली


या पाहणी दौऱ्यात ठाणे महानगरपालिकेने पातलीपाडा ते गायमुख या सात किलोमीटरच्या सर्विस रोड च्या कामाला 2001 पासून सुरुवात केली होती व 2003 ला हा रस्ता पूर्ण करण्यात आला होता परंतु या सर्विस रोड मधील चार ठिकाणांचा काही भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येत असल्याने याबद्दल संजय गांधी राष्ट्रीय उद्याने महापालिकेकडे याचा खुलासा सादर करावा असे पत्र दिले होते यावर महापालिकेने सल्लागाराची नेमणूक करून परवानगी मिळविण्याचे हे काम सल्लागारकडे दिले परंतु त्यांच्याकडून त्यांना दाद न मिळाल्याने हा आजतागायत या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत पडला होता तसेच सुरू झालेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता .


तसेच गेल्या तीन वर्षात या मार्गावर  500हुन अधिक अपघात झाले असून  150 अपघाती मृत्यू मुखी  पडले आहेत यासाठी खासदार राजन विचारे यांनी याबाबत पुढाकार घेऊन मंत्रालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली व या पाहणी दौऱ्यात संजय गांधी  उद्यानाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हे काम सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली लवकरच  महापालिकेला आम्ही परवानगी देऊ  असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले 


यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील ,पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, परिक्षेत्र वनाधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे राजेंद्र पवार  तसेच ठाणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता रवींद्र खडताळे, शहर विकास विभागाचे रामदास शिंदे ,पाडगावकर ,ढोले तसेच स्थानिक नगरसेवक नरेश मनेरा व इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रखडलेले मार्गातील ठिकाणांची नावे

पातलीपाडा तबेला 68 मीटर

 डोंगरीपाडा 72 मिटर 

कॉसमॉस (डी मार्ट )34 मीटर 

गायमुख 288 मिटर

घोडबंदरच्या सर्विस रोडच्या रखडलेल्या कामाची खासदार राजन विचारे कडून पाहणी घोडबंदरच्या सर्विस रोडच्या  रखडलेल्या कामाची खासदार राजन विचारे कडून पाहणी Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads