Header AD

कोव्हिड-१९ वरील संभाव्य लसीच्या आशेने सोन्यातील नफ्यावर मर्यादा

 मुंबई, २७ नोव्हेंबर २०२० : कोव्हिड-१९ वरील लसीच्या आशेमुळे पिवळ्या धातूतील नफा मर्यादित राहिला. साथीच्या प्रभावामुळे मागणीमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरातही घट होत आहे. मात्र अमेरिकेच्या डॉलरमध्ये अवमूल्यन झाल्याने औद्योगिक धातूंना आधार मिळाला. तथापि, लसीबाबत काहीशी साशंकता असल्याने नफ्यातही मर्यादा दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: सोन्याने ०.३% ची वृद्धी घेतली व ते १८१०.६ प्रति औसांवर स्थिरावले. जागतिक मध्यवर्ती बँकांकडून आणखी मदत मिळण्याची आशा वाढत असल्याने  पिवळ्या धातूचे आकर्षणही वाढले. तथापि, कोरोना विषाणूविरोधातील संभाव्य लसीच्या आशेमुळे या नफ्यावर मर्यादा आल्या. जगातील विविध अर्थव्यवस्थांमध्ये कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये धोकादायक वाढ दिसत असल्याने, तसेच नव्या लॉकडाऊनच्या चिंतेमुळे जगातील मध्यवर्ती बँकांकडून अतिरिक्त मदतीची आशाही वाढली आहे. यामुळेही पिवळ्या धातूच्या दरांना आधार मिळाला.

अमेरिकेच्या डॉलरमध्ये अवमूल्यन झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे दर इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. जगातील सर्वात मोठी अर्थसत्ता असलेल्या अमेरिकेत कोरोनाच्या साथीमळे कामगार बाजारावर मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. अनेक अमेरिकी नागरिकांनी बेरोजगारीचे दावेही केले आहेत. संभाव्य कोव्हिड-१९च्या लसीबाबत गुंतवणूकदार अजूनही साशंक आहेत. त्यामुळेही सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आणखी आधार मिळेल, असा अंदाज आहे.


कच्चे तेल: साथीचा आजाराचा प्रभाव सुरूच असल्याने तसेच लिबियातील तेल उत्पादनात वाढ झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर दबावाखाली असण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिका, युरोप यासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांना कोरोना विषाणूचा जबरदस्त धक्का सहन करावा लागत आहे. या अर्थव्यवस्थांमध्ये नव्याने लॉकडाऊनची शक्यता असल्यानेही कच्च्या तेलाची मागणी घटली.

कच्च्या तेलाचे दर घटत असताना, अमेरिकी तेलसाठ्यात घट झाल्याने तसेच संभाव्य कोव्हिड लसीच्या आशेमुळे तेलाच्या दरांना काहीसा आधार मिळाला.

अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनतर्फे जारी केलेल्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड स्टॉकपाइल्स ७४५,००० टनांवर पोहोचले.

ओपेक व सदस्यांकडून येत्या काही महिन्यात तीव्र उत्पादन कपात होणार असल्यानेही क्रूडला आधार मिळेल. संकटग्रस्त तेल बाजार व आर्थिक सुधारणेचे संकेत अद्याप दिसत नसल्याने तसेच घटती मागणी लक्षात घेता, नियोजित उत्पादन कपात जानेवारी २०२१ पर्यंत ओपेककडून मागे घेतली जाण्याचीही शक्यता आहे. यासोबतच, कोरोना विषाणूविरोधातील लसीबाबत अनिश्चितता आणि तेलाचा अतिरिक्त पुरवठा यामुळेही दरांवर आणखी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोव्हिड-१९ वरील संभाव्य लसीच्या आशेने सोन्यातील नफ्यावर मर्यादा कोव्हिड-१९ वरील संभाव्य लसीच्या आशेने सोन्यातील नफ्यावर मर्यादा Reviewed by News1 Marathi on November 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads