Header AD

दहा लाखांपेक्षा जास्त ट्रक मालकांचा 'व्हील्सआय'वर विश्वास

 

जीपीएस, फास्टॅग, डीझेलवर कॅशबॅक अशा विविध सुविधांचा लाभ....


मुंबई, १० नोव्हेंबर २०२० : व्हील्सआय हे ट्रक मालकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित असलेले हायपर ग्रोथ स्टार्सअप आहे. भारतीय रस्त्यांवर धावणा-या ट्रकपैकी दहा लाखांहून अधिक ट्रक मालक व्हील्सआयसह जोडले गेले आहेत. याच्या मदतीने ट्रकला जीपीएसशी ट्रॅक करणे, फास्टॅग मॅनेज करणे, डीझेलवर कॅशबॅकसहित इतर अनेक सेवा ट्रकमालकांना सहजपणे मिळतात. या सर्वांसह व्हील्सआय, ट्रकची अधिक सुरक्षा, रिअल टाइम व्हिजिबिलिटी आणि ट्रकचे

वाहन सुव्यवस्थित करण्यासाठी अनेक सुविधा, खर्च आणि व्यवसायांचा लाभ घेण्याचे उपायही ग्राहकांना सांगतो. या सर्व गुण वैशिष्ट्यांमुळे ट्रक मालाकांचा व्हील्सआयवरील विश्वास वाढत असून दररोज सुमारे १००० ट्रक या मंचाशी जोडले जात आहेत. सध्या देशातील १५०० पेक्षा जास्त शहरांमध्ये व्हील्सआय आपल्या सेवा आणि सुविधा प्रदान करते.


व्हील्सआयचे ईआयआर सोनेश जैन म्हणाले, “व्हील्सआयमध्ये आम्ही लहान आणि मध्यम ट्रक मालकांना सुलभ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपकरणांसह सक्षम बनवतो. त्यांची कार्यक्षमता वाढवून आणि आत्मविश्वासासह व्यापार करण्यात मदत करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. आमची टीम एक मजबूत आणि सर्वात कठीण असलेल्या बाजारात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली, हे पाहणे अधिक समाधानकारक आहे. यातून आमचा ग्राहककेंद्रीत दृष्टीकोन आणि कठोर मेहनत दिसून येते. आम्ही ट्रकिंग ऑपरेशन्स केवळ सोपे केले नाहीत तर ट्रकिंग इंडस्ट्रीला त्याच्या हक्काची प्रशंसा मिळावी, याचीही सुनिश्चिती केली आहे."

दहा लाखांपेक्षा जास्त ट्रक मालकांचा 'व्हील्सआय'वर विश्वास दहा लाखांपेक्षा जास्त ट्रक मालकांचा 'व्हील्सआय'वर विश्वास Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads