Header AD

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ (आप्पा) शिंदे
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कल्याण-डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी पदी जेष्ठ आणि अनुभवी नेते जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी वंडार पाटील आज नियुक्ती करण्यात आली. प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.मागील काही महिन्यापासुन कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचा विषय प्रलंबित होता. अनेक पदाधिकारी या पदासाठी इच्छुक होते. याबबत दिवाळी पूर्वी निरीक्षक आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व माजी आमदार विद्या चव्हाण यांनी कल्याण येथे येऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या व तसा अहवाल प्रदेश कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार आज हे नियुक्ती पत्र देण्यात आले.


आप्पा शिंदे हे वैद्यकीय क्षेत्रात मागील चाळीस वर्षापासून कार्यरत असून, ते आठ वेळा राज्य संघटनेच्या अधाक्षपदी निवडून आलेले आहेत. तसेच अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचेही ते सुमारे १८ वर्षापासून नेतृत्व करत आहेत. त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखूनच शरद पवार यांनी त्यांना २०१४ साली विधान परिषदेची आमदारकी दिलेली होती. सन २००५ मध्ये आप्पांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पहिला महापौर विराजमान झालेला होता. 


जगन्नाथ शिंदे यांची संघटनात्मक कामगिरी व सहा वर्षाच्या आमदार पदाच्या कार्यकाळातील प्रशासकीय अनुभव याचा लाभ नक्कीच त्यांच्या नवीन पदाच्या कामात होईल. त्याचप्रमाणे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हनून परिचित असलेल्या जगन्नाथ  शिंदे यांचे संघटनेतील वरिष्ठांशी पहिल्यापसून सौहार्दाचे संबंध असल्याने त्याचा फायदा नक्कीच कल्याण-डोंबिवली शहरातील राष्ट्रवादी  कॉंग्रेस  पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ (आप्पा) शिंदे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ (आप्पा) शिंदे Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

◆ लाखो लोकांना लघु उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश.. मुंबई, २२ जानेवारी २०२१ :  भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेल...

Post AD

home ads