भाजप कल्याण शहर सरचिटणीसपदी गौरव गुजर यांची नियुक्ती
कल्याण , कुणाल म्हात्रे : भारतीय जनता पक्षाच्या कल्याण शहर सरचिटणीसपदी युवा कार्यकर्ता गौरव गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी नुकतेच त्याबाबतचे नियुक्तीपत्र गुजर यांना प्रदान केले. यावेळी भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे उपस्थित होते.
गेल्या १० वर्षांपासून भाजपात असणाऱ्या गौरव गुजर यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. युवकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांचे गुजर यांनी यशस्वीपणे आयोजन केले आहे. ज्यामध्ये 'कल्याण आयडॉल' या गायन स्पर्धेचे नाव अग्रक्रमाने येतं. त्याचजोडीला विविध आंदोलन असो की युवकांचे विषय असो. गुजर यांनी भाजयुमोच्या माध्यमातून हिरीरीने त्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. तर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गुजर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला वाढदिवसही चर्चेचा विषय ठरला होता.
तर २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवण्यासह २०१५ मध्ये त्यांनी केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूकही लढवली आहे. एवढा सर्व अनुभव पाहता त्यांची भाजप शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान पक्षाने आपल्यावर सोपवलेल्या सरचिटणीसपदाच्या जबाबदारीला १०० टक्के न्याय देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

Post a Comment