Header AD

अवकाळी पाऊस, करोनामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत
नाशिक , प्रतिनिधी  : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठातर्फे २०२० -२०२१ या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन प्रवेश घेताना प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सुविधा मंगळवार दिनांक ३ नोव्हेंबर पासून उपलब्ध करण्यात आली आहे.राज्यभरात अनेक ठिकाणी झालेले अवकाळी पाऊस आणि करोनाचा प्राद्र्भाव यामुळे हा निर्णय घेण्यात येऊन प्रवेशाच्या मुदतीतही वाढ करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा.ई वायूनंदन यांनी दिली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांसाठी या वर्षीचे प्रवेश करोनाच्या प्रादुर्भावामुळे विलंबाने सुरू झाले. करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यातच गेल्या महिन्यात सर्वत्र अवकाळी पावसाने घातलेले थैमान, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इच्छा असूनही विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेताआले नाहीत. 


अनेक भागात पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.पाऊस आणि करोना महामारी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा एक प्रयत्न आणि पुरेशा शुल्का अभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये किंवा शिक्षणापासून ते वंचित राहू नयेत, म्हणून आता 3 नोव्हेंबरपासून प्रवेश घेणार्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना दोन टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 


विद्यार्थ्यांना लगेचच संपूर्ण शुल्क ऑनलाईन भरण्याची गरज नाही. एकुण शुल्कापैकी पन्नास टक्के शुल्क भरून त्यांना हव्या असलेल्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. उरलेले पन्नास टक्के शुल्क दुसर्या टप्प्यात विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत भरता येईल.यासोबतच प्रवेश घेण्याची मुदतही 15 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे Sया सुविधेचा लाभ विद्यार्थांनी नक्कीच घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यपीठा तर्फे करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. वामन नखाले रिजनल डायरेक्टर यचमुवि  मुंबई रिजन यांनी दिली आहे.
अवकाळी पाऊस, करोनामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत अवकाळी पाऊस, करोनामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत Reviewed by News1 Marathi on November 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

रेल्वे मार्गाच्या भूसंपादना साठी लवकरच प्राधिकृत अधिकारी

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ...

Post AD

home ads