Header AD

बिहार मधील विजयाचा कल्याणात भाजपाकडून जल्लोष घोषणा बाजी व मिठाई वाटप करत व्यक्त केला आंनद
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  बिहारच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप भटके विमुक्त आघडीचे प्रदेश अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष केला. यावेळी घोषणाबाजी करत मिठाई वाटप करण्यात आली.

 माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बिहार मधील विजय हा विकासकामांवर विश्वास ठेवुन केलेला विजय आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांनी पुन्हा विश्वास दाखवला, महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीसाठी व्यूहरचना केली होती. त्यातून जागा निवडून आल्या आहेत. हा विजय नरेंद्र मोदी यांचा आहे असे सांगितले. 


तर शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी बिहारच्या जनतेने भाजपाला बहुमदिल्याबद्दल बिहारमधील नागरिकांचे आभार मानले. तसेच येत्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते.

बिहार मधील विजयाचा कल्याणात भाजपाकडून जल्लोष घोषणा बाजी व मिठाई वाटप करत व्यक्त केला आंनद बिहार मधील विजयाचा कल्याणात भाजपाकडून जल्लोष घोषणा बाजी व मिठाई वाटप करत व्यक्त केला आंनद Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads