भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ उत्तर भारतीय मोर्चा कार्यकारणी जाहीर
डोंबिवली | शंकर जाधव : डोंबिवली ग्रामीण भागात उत्तर भारतीयांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे भाजपने ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणी सुरु केली आहे.भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ उत्तर भारतीय मोर्चा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब,उत्तर भारतीय कल्याण जिल्हा अध्यक्ष संजय तिवारी, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.
महासचिवपदी रमाशंकर दीक्षित,संतोष कनौजिया,सचिवपदी इंद्रजीत शर्मा,उपाध्यक्षपदी दिनेश जायस्वाल,राजकुमार पांड्ये,अनुप वर्मा,हार्दिक शर्मा,गुलाब यादव, सुनील वर्मा आणि अजित सिंह तर सदस्यपदी महेंद्र यादव,निखील गुप्ता, नागेश्वर मिश्रा,शैलेन्द्र मिश्रा,ध्रुव गुप्ता आणि तुषार गुप्ता तर उत्तर भारतीय मोर्चा मिडीया प्रभारीपदी देवीद्याल शुक्ला यांची यांची नियुक्ती करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.निवडणुका काही महिनाच्या अवधीवर येऊन ठेपल्या आहेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्तरप्रदेश, बिहार येथील नागरिक राहत आहेत.त्यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे भाजपला नक्कीच याचा नक्कीच फायदा होणार आहे.

Post a Comment