Header AD

भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या खड्यांबद्दल तरुणांची "माझा रस्ता माझी जबाबदारी"उपक्रमभिवंडी |  प्रतिनिधी  :  भिवंडी-वाडा-मनोर या संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी अत्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत.आणि याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि या महामार्गावर अपघातही खूप होत आहेत त्यामुळे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवक प्रमुख प्रमोद पवार आणि स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी "माझा रस्ता माझी जबाबदारी"हा उपक्रम राबवून सदरचे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.सुरुवातीपासूनच काही ना काही कारणांमुळे हा महामार्ग वादातच राहिला आहे.अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम याचे झालेले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्षच होत आलेले आहे.संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या जीवघेण्या खडयांमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप जीव मृत्युमुखी पडले आहेत,तर हजारो नागरिक वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन या धोकादायक महामार्गावरून रोज प्रवास करीत आहेत.या महामार्गाच्या विरोधात यापूर्वीही श्रमजीवी संघटना आणि स्थानिक तरुणांनी अनेक आंदोलने केली आहेत.


गेल्या वर्षी डॉ.नेहा शेख या तरुणीचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यावर तरुणांनी आंदोलन करीत या रस्त्यावरील कवाड येथील टोल नाका बंद केला परंतु आजपर्यंतही परिस्थिती बदलली नसून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि येथील लोकप्रतिनिधीनी याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले असल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा युवा प्रमुख प्रमोद पवार यांनी आणि संपूर्ण महामार्गावरील स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी युवा क्रांतिकारक स्व. वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मदिवशी या महामार्गावरील आपल्या आपल्या गावाशेजारील रस्ता "माझा रस्ता माझी जबाबदारी" अश्या प्रकारचे आगळेवेगळे धोरण ठरवून श्रमदान करून या महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.


यासाठी त्यांनी जसे जमेल तसे साहित्य जाम करून हे खड्डे भरण्याचे ठरविले आहे.आणि खड्डेमुक्त महामार्ग बनविण्याचे ध्येय समोर ठेवत अधिकाधिक तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. आतापर्यंत या महामार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधीनी पूर्णपणे दुर्लक्षच केले आहेत.ते एवढे निगरगट्ट झाले आहेत की एवढे अपघात होऊनही सदरचा महामार्ग दुरुस्त करण्याकडे कानाडोळा होत आहे.त्यामुळे आम्ही हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे."

भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या खड्यांबद्दल तरुणांची "माझा रस्ता माझी जबाबदारी"उपक्रम भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या खड्यांबद्दल तरुणांची "माझा रस्ता माझी जबाबदारी"उपक्रम Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads