Header AD

मेगाब्लॉक दरम्यान परिवहन बस सेवेला दोन लाखांचे उत्पन्न २० हजार प्रवाशांनी केला केडीएमटीने प्रवास
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पत्रीपुल गर्डर लाँचिंगसाठी दोन दिवस घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमूळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटीतर्फे विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉकच्या वेळेत म्हणजेच ८  तासांमध्ये तब्बल २० हजार प्रवाशांनी केडीएमटीतुन प्रवास केला. यातून परिवहन सेवेला तब्बल दोन लाखांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी दिली.


सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास मेगाब्लॉक सुरू झाल्याने रेल्वेतर्फे लोकल तसेच एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामूळे या दोन दिवसांत कल्याण - डोंबिवली मार्गावर २३२ फेऱ्या, कल्याण टिटवाळा मार्गावर ७८  फेऱ्या,  कल्याण- बदलापूर मार्गावर ४२ फेऱ्या, विठ्ठलवाडी -डोंबिवली मार्गावर १४ अशा ३६६ फेऱ्या चालवण्यात आल्या. ज्याद्वारे सुमारे २० हजार प्रवाशांनी इच्छित स्थळी प्रवास केला. यातून परिवहन सेवेला तब्बल दोन लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी सांगितले. यासाठी परिवहन सदस्य सुनिल खारुक, अनिल पिंगळे, दिनेश गोर आदींचेही या बसेसच्या नियोजनात सहकार्य लाभले. 

मेगाब्लॉक दरम्यान परिवहन बस सेवेला दोन लाखांचे उत्पन्न २० हजार प्रवाशांनी केला केडीएमटीने प्रवास मेगाब्लॉक दरम्यान परिवहन बस सेवेला दोन लाखांचे उत्पन्न २० हजार प्रवाशांनी केला केडीएमटीने प्रवास Reviewed by News1 Marathi on November 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

Ganesh Deshmukh Saheb Happy Birthday

 

Post AD

home ads