Header AD

"अ" प्रभागक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथने घेतला मोकळा श्वास

 


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवुन नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी फुटपाथ मोकळे करणे बाबत मनपा आयुक्त अँक्शन मोड घेतल्याने रविवारी शहाड, आंबिवली, मोहने आंबिवली, टिटवाळा स्टेशन रोड परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित अतिक्रमणे हटविल्याने फुटपाथने मोकळा श्वास घेतल्याचे दिसत होते.


    कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील सर्व मुख्य रस्त्यावरीलपदपथावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मनुष्यबळ व पोलिस दलासमवेत १ नोव्हेंबर ते  १५ नोव्हेंबर या पंधरवड्यात  विशेष मोहिम राबवून धडक कारवाई  सुरू केली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील दुकानदारकिरकोळ विक्री करणारे विक्रेतेटपरी धारक व इतर व्यावसायिक यांनीत्यांच्याकडून महापालिका परिसरातील पदपथांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाहीयाची दक्षता घ्यावी. अन्यथा होणा-या कारवाई सामोरे जावेअसे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.


आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार "अ" प्रभाग क्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाई चा बडगा उचलित अ प्रभागातील शहाड, अंबिवलीमोहने बल्याणीटिटवाळा स्टेशन रोड परिसरातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथ वरील अतिक्रमणावर कारवाई केली. यामध्ये  १५ टपर्या,  १४ हातगाड्या,  १७ शेड६ बाकडे  जेसीबीच्या सहाय्याने तसेच  हातोडा चालवित निष्कसित केले. यामुळे फुटपाथवर अतिक्रमण करीत धंदा करणाऱ्या फेरीवालेहातगाडीवालेठेलेवाले यांचे धाबे दणाणले असुन मुख्य रस्त्यावरील फुटपाथने मोकळा श्वास टाकल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे.

"अ" प्रभागक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथने घेतला मोकळा श्वास "अ" प्रभागक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथने घेतला मोकळा श्वास Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads