Header AD

जुनी डोंबिवलीतील अरुण निवास मित्र मंडळाचा ६० फूटी ‘पद्‌मदूर्ग’ किल्ला ठरला आकर्षक

डोंबिवली , शंकर जाधव : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या असंख्य किल्ल्यांची माहिती तरूण पिढीला होणे गरजेचे म्हणून प्रतिवर्षी जुनी डोंबिवली अरूण निवास मधील मित्रमंडळ दिवाळीत भव्य किल्याची प्रतिकृती उभारते. जुनी डोंबिवली येथील अरुण निवास मित्र मंडळ सतत बारा वर्षे किल्ले बांधणीची तपश्चर्या अवरत सुरु आहे. यावर्षीही भव्य ६० फुटी चौरस 'दुर्ग पद्मदुर्ग’ उभारण्यात आला असून तो किल्ला डोंबिवलीत आकर्षणाचे केंद्र झाले आहे. अरुण निवास मित्र मंडळ महाराष्ट्रात वसलेले किल्यांच्या भव्य अशा प्रतिकृती उभारत आहेत. मंडळाने पहिल्या वर्षी सिंधुदुर्ग २० फूट लांब अशी भव्य प्रतिकृती उभारली. आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी मंडळ महाराष्ट्रात वसलेले अनेक छोटे मोठे किल्ले उभारत आहे. यामध्ये राजगड, विजयदुर्ग, प्रतापगड, मुरुड जंजिरा, रायगड, नळदुर्ग, सिंहगड, तोरणा, पुरंदर, खांदेरी–उंदेरी आदी किल्याच्या प्रतिकृती उभारून किल्ले उभारणीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी कोरोनाच्या महामारीत त्या गोष्टीची जाण ठेऊनसुरक्षा साधन वापरूनप्रत्येकाची काळजी घेत मुरुडच्या सागर किनाऱ्यावर पश्चिम दिशेला असणाऱ्या समुद्राच्या आत असणाऱ्या खडकाळ भागावर छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेला पद्‌मदूर्ग उर्फ कासा किल्ला याची प्रतिकृती उभारून सर्वाना थक्क केले आहे. पद्‌मदूर्ग’ किल्ला प्रतिकृती तयार करण्यासाठी काळी चिकट माती, लाल माती, दगड, विटा, कलर, झाडे अशा गोष्टी वापरण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे विहिरीतील जिवंत मासे असल्याने त्यांचा लहान मुले सुखद आनंद घेत आहेत. अरुण निवास मित्र मंडळाचा मुख्य हेतू आणि ध्येय म्हणजे किल्ल्याची महान परंपरा टिकवून ठेवणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा संदेश घेऊन भविष्यातील पिढीला प्रेरणा देणे असल्याचे मंडळाचे पडद्यामागील सूत्रधार बाबू पाटील यांनी सांगितले. किल्ला उभारणीसाठी आठ दिवस मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत होते असेही त्यांनी पुढे सांगितले.

जुनी डोंबिवलीतील अरुण निवास मित्र मंडळाचा ६० फूटी ‘पद्‌मदूर्ग’ किल्ला ठरला आकर्षक  जुनी डोंबिवलीतील अरुण निवास मित्र मंडळाचा ६०  फूटी ‘पद्‌मदूर्ग’ किल्ला ठरला आकर्षक Reviewed by News1 Marathi on November 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads