Header AD

भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने भातखरेदी केंद सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश
भिवंडी ,  प्रतिनिधी  :  राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुघडफाटा येथील  हमीभाव भात खरेदी केंद्रावर धडक  देत शेतकऱ्यांनी आक्रोश आंदोलन करून 1 डिसेंबर पर्यंत भात खरेदी केंद्र सुरु न  केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन चा फटका शेतकऱ्यांना बसला होता मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भातपीक चांगले आल्याने शेतकरी सुखावला होता मात्र परतीच्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील तब्बल 50 टक्के भातशेतीचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून उरलेले सुरलेले 50 टक्के भात हाती आल्याने हे भात खरेदी केंद्रात  विकण्यात येतात त्यामुळे भात विकून आपले कर्ज आणि पुढल्या वर्षासाठी कुटुंबाला सांभाळण्यासाठी पैसे ठेवतो मात्र अद्याप भात खरेदी केंद्र अद्याप सुरु झाले नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे भात खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करीत असून 1 डिसेंबर पर्यंत सुरु न झाल्याने आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 


भात विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय देखील उरलेला नाही.मात्र त्यासाठी शासनाचे भिवंडी तालुक्यात हमी भाव भात पीक केंद्र अद्यापी सुरु झालेले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मार्फत दरवर्षी उप ठेकेदार ( सब एजेंसी) नेमून शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले जात आहे.मात्र यावर्षी भाताचा हंगाम सुरु होऊन 2 महिने  उलटले तरी  देखील भात खरेदी केंद्र सुरु झालेले नाही.त्यामुळे भात खरेदी व्यापारी शेतकऱ्यांना कमी भाव देऊन लुटत आहेत.


राज्य शासन प्रति क्विंटल 1815 रुपये व 500 रुपयांचे अधिकचे बोनस असे 2315 रुपये देत आहे.भिवंडी तालुक्यात 22 हजार हेक्टर शेतजमीनीवर भाताचे पीक घेण्यात आले आहे.227 महसुल गावांपैकी 167 गावांमध्ये भाताचे पिक घेतले जात आहे.भात पिकाचे उत्पन्न हाती आल्यावर त्यापैकी अर्ध्याअधिक धानाची विक्री करून शेतकरी सोसायटी किवा बँकाच्या  घेतलेल्या  कर्जाची परतफेड करून आपल्या कुटूंबाचे गुजारना  करीत असतो.त्यासाठी राज्य शासनाने तात्काळ दुगाड,झिडके आणि पडघा येथे भात खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करीत  आहे. 1  डिसेंबर पर्यंत केंद्र सुरु न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने भातखरेदी केंद सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने भातखरेदी केंद सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश Reviewed by News1 Marathi on November 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads