Header AD

कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५०,८८३ एकूण रुग्ण तर १०१६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत २०१ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १२० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,८८३ झाली आहे. यामध्ये १३२४ रुग्ण उपचार घेत असून ४,५४३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३२,  कल्याण प – २९डोंबिवली पूर्व ३७,  डोंबिवली प- १७मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५ रुग्ण टाटा आमंत्रामधून३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून१ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १२० नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads