Header AD

आयटीसी फूड्सचा रिटेलर्स फर्स्ट हा उपक्रम देत आहे भारतातील रिटेलर्सच्या सुरक्षिततेला पाठबळ
भारत , ३० नोव्हेंबर २०२० : ‘सब साथ बढें’ या आयटीसी लिमिटेडच्या तत्त्वाशी सुसंगती राखत, फूड्स डिव्हिजनने एका रिटेल एंगेजमेंट इनिशिएटिवचे नेतृत्व केले. या उपक्रमाचा भर रिटेलर्सची सुरक्षितता निश्चित करण्यावर होता. या उपक्रमामध्ये देशभरातील २०,०००हून अधिक रिटेलर्सना सामावून घेण्यात आले आणि कोविड साथीशी निगडित असे धोके त्यांच्याबाबत किमान स्तरावर आणता येतील अशा पद्धतीने त्यांच्या सुरक्षितताविषयक गरजांची पूर्तता करण्यात आली. कंपनीच्या ग्राहकांच्या पहिल्या फळीला मदत करण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात आला. 


रिटेलर्समध्ये या आव्हानात्मक काळात आपल्या ग्राहकांना सेवा देण्याची क्षमता निर्माण करताना प्रथम त्यांना कामाकरता सुरक्षित व स्वच्छ वातावरण मिळेल याची निश्चिती या उपक्रमाद्वारे करण्यात आली. रिटेलर्स हा समुदाय रिटेल/व्यवसाय परिसंस्थेचा कणा आहे. शेवटच्या ग्राहकाला अगदी दुर्गम ठिकाणांवरही अत्यावश्यक वस्तू रिटेलर्समार्फतच मिळू शकतात. या प्रोग्रामने आसपासच्या किराणा दुकानांना तसेच जनरल स्टोअर्सना संरक्षक विंडो शील्ड्स, संरक्षक साधने आणि सोशल डिस्टन्सिंग कर्टन्स आदी साहित्य पुरवले. जेणेकरून, या दुकानदारांना वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षिततेचे नियम पाळून आपले दुकान सुरू ठेवता यावे.  


आशीर्वाद, सनफीस्ट बिस्किट्स, सनफीस्ट YiPPee!, बी नॅचरल, आशीर्वाद स्वस्ती आणि कॅण्डीमॅन यांसारख्या आघाडीच्या ITC Foods ब्रॅण्ड्सनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. या रिटेलर्सच्या कामाचा भाग म्हणून दिवसभरात त्यांची अनेक ग्राहकांसोबत आंतरक्रिया होते, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांची स्थिती काहीशी असुरक्षित होते. सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक स्वच्छतेचे उपाय ही आजच्या काळाची गरज असल्याने या ब्रॅण्ड्सद्वारे रिटेलर्सना उच्च दर्जाची संरक्षक साधने त्यांच्या सुरक्षिततेची व संरक्षणाची निश्चिती करण्यासाठी पुरवण्यात आली. 


यातील प्रोटेक्टिव्ह शील्ड आणि सोशल डिस्टन्सिंग कर्टन्स हे पोलीमरायझिंग व्हिनाइल क्लोराइडपासून (पीव्हीसी) तयार करण्यात आले आहेत, तर विंडो शील्ड फ्रेम्स या रिसायकल्ड कोरुगेटेडे प्लास्टिकपासून तयार करण्यात आल्या आहे. त्यामुळे उच्चस्तरीय सुरक्षितता राखणे शक्य होते. ITC Foodsने यापुढील पाऊल टाकत रिटेलर्सच्या सुरक्षिततेसाठी महानगरांमध्ये सॅनिटायजेशन अभियानही राबवले. याची सुरुवात उत्तरेकडील बाजारपेठांपासून झाली आणि त्यानंतर हे अभियान दक्षिण व पूर्व भारतातील महानगरांमध्ये राबवले. हे अभियान पुढील काळात इतर बाजारपेठांमध्येही राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विंडो शील्ड फ्रेम्सची अंमलबजावणी भारतभर करण्यात येत आहे.

आयटीसी फूड्सचा रिटेलर्स फर्स्ट हा उपक्रम देत आहे भारतातील रिटेलर्सच्या सुरक्षिततेला पाठबळ आयटीसी फूड्सचा रिटेलर्स फर्स्ट हा उपक्रम देत आहे भारतातील रिटेलर्सच्या सुरक्षिततेला पाठबळ Reviewed by News1 Marathi on November 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads