भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाच्या वतीने नागरिकांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप
डोंबिवली, शंकर जाधव : कोरोना संकटामुळे व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. नागरिकांसाठी ह्या वर्षीचा दिपावली सण हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. यंदाची दिपावली नागरिकांना आनंददायी जावी म्हणून डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात नागरिकांसाठी फराळासाठी उपयुक्त असलेले सामान पिठी साखर, रवा, चना डाळ व मैदा यांचे अत्यल्प दरामध्ये वाटप करण्यात आले. सदर योजनेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाच्या वतीने नागरिकांना दिवाळी फराळ साहित्याचे वाटप
Reviewed by News1 Marathi
on
November 12, 2020
Rating:

Post a Comment