टिटवाळ्यात अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा
कल्याण, कुणाल म्हात्रे : "अ" प्रभागातील टिटवाळ्यातील मांडा पश्चिमेतील धनगर वाडी परिसर येथे अनाधिकृत मोबाईल टाँवर विघुत पुरवठा खंडित करण्याची कारवाई, वडवली येथील ६ अनाधिकृत रुमचे बांधकाम तसेच मोहने येथे एका धाब्याच्या अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली. तर मोहने परिसरात फुटपाथवरील अनाधिकृत हातगाडी, टिटवाळा परिसरातील हातगाडीवर तोडक कारवाई करण्यात आली. तसेच टिटवाळा एमटीडीसी हद्दीतील दोन अनाधिकृत मटण दुकानांवर प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई व्यापकपणे सुरू ठेवली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' क्षेत्रातील टिटवाळा मांडा पश्चिमेतील धनगर वाडी परिसरात अनधिकृत असलेल्या मोबाईल टाँवरचा विघुत पुरवठा शुक्रवारी खंडित करण्यात आला. वडवली परिसरात ६ रूमचे अनाधिकृत बांधकामावर हातोडा चालवित तोडक कारवाई केली. तसेच टिटवाळा येथे एक मजली धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात आली टिटवाळ्यात २ अनाधिकृत फुटपाथवरील हातगाड्या मोहने येथील फुटपाथवरील १ अनाधिकृत हातगाडी मनपाच्या अनाधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण पथकाने धडक कारवाई करीत हातोडा चालवित भुईसपाट केल्या.
टिटवाळा येथील एम.टी.डी.सी. हद्दीतील अनाधिकृत २ मटण दुकाने, तसेच मोहने येथील १ अनाधिकृत धाब्याचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईसाठी १ जे.सी.बी. अनाधिकृत बांधकाम विभागचे आठ पोलीस कर्मचारी तसेच अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी, "अ" प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केलेल्या अनाधिकृत बांधकामावरील कारवाई मुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा या कारवाईने धाबे दणाणले आहेत.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त सुधाकर जगताप यांच्या निर्देशानुसार कारवाईचा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यावर एमआरटीपी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

Post a Comment