Header AD

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानंतर २५ तारखेपासून रुग्णालय बंद ठेवत उपोषणाला  बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नगरसेवकाने संबंधित डॉक्टरची माफी मागितल्यावर डॉक्टरांनी उपोषणाचा निर्णय  मागे घेतल्याची घोषणा केली आहे.


कल्याण पश्चिमेतील वैष्णवी रुग्णालयामध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि रुग्णालयाचे डॉक्टर अश्वीन कक्कर यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या वादानंतर डॉक्टरांनी रुग्णालय बंद ठेवत आपल्या स्टाफसह उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र रुग्णालय बंद राहिल्यास याचा फटका रुग्णांना बसू शकतोया जाणीवेतून नगरसेवक महेश गायकवाड यांनी माघार घेत डॉक्टरांची माफी मागितली आहे.दोन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले. रुग्णालयाच्या बाहेर महिलेच्या नातेवाईकांनी थांबू नयेअशी ताकीद देण्यात आली होती. मात्रतरी देखील गर्भवती महिलेचे नातेवाईक घरी गेले नाहीत. त्यामुळे नातेवाईकासह गर्भवती महिलेससुद्धा डॉक्टर कक्कर यांनी बाहेर काढले. या प्रकरणी गायकवाड यांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती प्रसूती रुग्णालय असल्याने एकाही पुरुषाला आत सोडले जात नाही. त्यासाठी त्यांना ताकीद दिली होती. त्यांच्यासोबत अनुचित प्रकार केला नाहीअशी भूमिका डॉक्टर कक्कर यांनी मांडली आहे.

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads